Saturday, September 4, 2021

Tuesday, August 3, 2021

रेनवॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज

 रेनवॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज


     मित्रांनो उन्हाच्या व दुष्काळाच्या झळा आपण सारेच झेलतोय. 

        उन्हाळ्यातील प्रचंड उष्णता, दुष्काळी परिस्थिती आपल्याकडे पाचवीलाच पुजलेली असते. बोअरवेल व विहिरी कोरड्या पडतात. हंगामी नदीपात्र देखील कोरडं पडतं. 

     याउलट पावसाळ्यात धो धो कोसळणारा पाऊस, महापूर, अशी परिस्थिती. पडलेला हा जास्तीचा पाऊस समुद्राला वाहून जातो. हाच जास्तीचा पाऊस उपयोगात आणावा यासाठी नदीजोड ही संकल्पना पुढे आली. पण ती अस्तित्वात यायला अजून बराच काळ लागेल. 

          आणखी एक संकल्पना म्हणजे रेनवॉटर हार्वेस्टिंग!

त्यातही अजून एक संकल्पना म्हणजे बोअरवेल पुनर्भरण!


शेतीसाठी, घरगुती वापरासाठी शेकडो फूट बोअर मारून भरमसाठ भूजलाचा उपसा केला जातोय. पण हा भूजलसाठा केव्हातरी संपेल. मग पुढे काय? 

   पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या पावसाळ्यापासूनच  बोअरवेल पुनर्भरण करून भुजलसाठा वाढवायला हवा. पावसाचे पाणी पन्हाळी व पाईपद्वारे नैसर्गिक फिल्टर बसवून पुन्हा बोअरवेलमध्ये सोडल्यास भुजलसाठा व जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढेल!


आमच्या घरच्या बोअरवेलचे, गावातील अनेक बोअरवेलचे व शाळेतील बोअरवेलचे या पद्धतीने गेली काही वर्षे पावसाळ्यात पुनर्भरण केल्याने भूजलपातळीत वाढ होऊन पाणीसाठा वाढल्याचे दिसून आले. जानेवारी महिन्यातच आटून जाणाऱ्या बोअरवेलचं पाणी आत्ता मे महिन्याच्या अखेरपर्यंतही मुबलक असतं.


घराच्या, इमारतीच्या छतावर, टेरेसवर पडलेलं पावसाचे पाणी पन्हाळी व पाईपद्वारे, पाईपमध्येच लहानमोठी वाळू, कोळसा, दोन्ही बाजूने बारीक तारेची गाळणी, असे नैसर्गिक फिल्टर बसवून पुन्हा बोअरवेलमध्ये सोडल्यास भुजलसाठा व जमिनीखालच्या पाण्याची पातळी वाढेल! व छतावर पडणारे हे लाखो लिटर शुद्ध पाणी बोअरवेलच्या छिद्रातून थेट जमिनीतील पोकळ्यांमध्ये साठून राहील. परिसरात असणाऱ्या हजारो बोअरवेलचे असे जर पुनर्भरण प्रत्येकाने आपापल्या बोअरवेलचे केले तर कमी झालेली भूजल पातळी झपाट्याने वाढून अतिरिक्त प्रमाणात पडलेल्या पावसाची नैसर्गिक साठवण होईल. व उन्हाळ्यात जी भीषण पाणीटंचाई निर्माण होते त्यास आळा बसेल. परिसरातील विहिरींची देखील आपोआपच पाणीपातळी वाढेल.....  बरं यासाठी येणारा खर्च देखील अत्यंत कमी आहे.



मित्रांनो!  चला तर मग,

आपणही या मोहिमेत सहभागी व्हा!

व आपल्या पुढच्या पिढीसमोर रेन वॉटर हार्वेस्टिंगचा वेगळा आदर्श निर्माण करुया.


https://youtu.be/OkeMt1cM6ys











Saturday, July 31, 2021

EMRS प्रवेश

 


https://admission.emrsmaharashtra.com

एकलव्य मॉडेल रेसिडेन्सियल स्कूल प्रवेश अर्ज
( शैक्षणिक वर्ष २०२१-२२ )

प्रवेश अर्ज भरताना विचारात घ्यावयाच्या बाबी .


१ . प्रवेश अर्ज भरताना विद्यार्थ्यांचा सरल / स्टुडन्ट आयडी माहित असणे आवश्यक आहे .

२ . अर्जदार विद्यार्थी अनुसूचित / आदिम जमातीचा असावा .

३ . अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु -सहा लाखापेक्षा कमी असावे .

४ . विद्यार्थ्यांची निवड मागील वर्गातील वार्षिक परीक्षेच्या गुणांच्या आधारे करण्यात येईल .

५ . विध्यार्थ्यांच्या शाळेची निवड अर्जामध्ये नमूद केलेल्या पत्त्यानुसार करण्यात येईल .

६ . विद्यार्थ्यास एकूण ९०० पैकी प्राप्त गुण नमूद करावे लागतील , त्याचप्रमाणे संबंधित इयत्तेचे गुणपत्रक प्रवेश अर्जासोबत अंतर्भूत (Upload) करावे लागेल .

७ . अर्जदार विद्यार्थी आदीम जमातीचा असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी .

८ . अर्जदार विद्यार्थी दिव्यांग असल्यास त्याबाबत अर्जामध्ये नोंद करण्यात यावी .

९ . ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दिनांक 31-08-2021 ही आहे . मुदतीनंतर ऑनलाईन अर्ज भरावयाची लिंक बंद होईल याची कृपया दक्षता घ्यावी .

१० . ऑनलाईन प्रवेश अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण आल्यास     8788442237 या नंबर शी संपर्क करावा

Proccess

Sunday, July 4, 2021

Featured Post

इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ

इंग्रजी म्हणी — मराठी उच्चार व अर्थ 1. Actions speak louder than words. उच्चार: ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अर्थ: उक्तीपेक्षा कृती श्र...