Friday, November 25, 2022

संविधान

 २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करताना नक्की उपयोगी पडतील.


*घोषवाक्य , घोषणा !*

१. जब तक सूरज चाँद 
 तब तक संविधान

२. विवेक पसरवू जनाजनात
 संविधान जागवू मनामनात

३. समता, बंधुता, लोकशाही 
 संविधानाशिवाय पर्याय नाही

४. कर्तव्य, हक्कांचे भान 
 मिळवून देते संविधान 

५. संविधान एक परिभाषा है
 मानवता की आशा है 

६. संविधानावर निष्ठा 
 हीच व्यक्तीची प्रतिष्ठा 

७. संविधानाची मोठी शक्ती 
 देई आम्हा अभिव्यक्ती

८. मिळून सारे देऊ ग्वाही 
 सक्षम बनवू लोकशाही 

९. संविधानाची कास धरू
 विषमता नष्ट करू 

१०. सर्वांचा निर्धार 
 संविधानाचा स्वीकार 

११. संधीची समानता 
 संविधानाची महानता

१२. संविधानाने दिले काय?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

१३. संविधान आहे महान
 सर्वांना हक्क समान 

१४. लोकशाही गणराज्य घडवू
 संविधानाचे भान जागवू

१५. संविधानाचा सन्मान 
 हाच आमचा अभिमान 

१६. भारत माझी माऊली 
 संविधान त्याची सावली 

१७. श्रद्धा, उपासनेचे स्वातंत्र्य 
 हाच संविधानाचा मूलमंत्र

१८. नको ताई घाबरू 
 चल संविधान राबवू

१९. जर हवी असेल समता
 तर मनात जागवू बंधुता

२०. सबसे प्यारा 
 संविधान हमारा

२१. अरे, डरने की क्या बात है?
संविधान हमारे साथ है

२२. संविधानाची महानता
 विविधतेत एकता 

२३. देशभरमे एकही नाम
 संविधान! संविधान!

२४. समानता कशाची?
दर्जाची, संधीची

२५. अरे, सबके मुँह में एकही नारा
 संविधान हमारा सबसे प्यारा

२६. लोकशाहीचा जागर 
 संविधानाचा आदर

२७. तुमचा आमचा एकच विचार 
 संविधानाचा करू प्रचार

२८. ना एक धर्म से, ना एक सोच से
 ये देश चलता है संविधान से!

२९) दर्जाची, संधीची, समानता, 
हीच संविधानाची महानता

३०) समानता संधींची,
संविधानाच्या गाभ्याची

३१) स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,
हाच संविधानाचा हेतू हाय

३२) संविधानाची अफाट शक्ती,
मुक्तविचार अन् अभिव्यक्ती

३३) संविधान सर्वांसाठी,
हक्कासाठी, न्यायासाठी

३४) ऊठ, नागरिका, जागा हो,
संविधानाचा धागा हो

३५) जातीयतेच्या बेड्या तोडू,
संविधानाने भारत जोडू

३६) संविधान आपले आहे कसे ?
सर्वांना न्याय देईल असे

३७) संविधानाने दिला मान,
स्त्री-पुरुष एकसमान

३८) संविधानाचा विचार काय ?
स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय

३९) संविधान देते समान पत,
एक व्यक्ती – एक मत

४०) घरात कोणत्याही धर्माचे,
समाजात मात्र संविधानाचे

४१) अत्याचार-जुलूम नष्ट करा,
संविधानाचा ध्यास धरा

४२) भारताचे संविधान,
भारतीयांचा सन्मान

४३) स्वातंत्र्य, समता, बंधुता,
संविधान सांगते एकात्मता

४४) वंचिताना देई उभारी,
भारतीय संविधान लय भारी

४५) बाबासाहेबांचे योगदान,
भारताचे संविधान

४६) लोकशाहीचे देते भान,
भारतीय संविधान

४७) भारताचा अभिमान, 
संविधान ! संविधान !

४८) समाजाला जागवू या,
संविधान रुजवू या

४९) सर्वांना देई दर्जा समान,
संविधानाचे काम महान

५०) संविधानाचे आश्वासन,
सर्वांना कायद्याचे संरक्षण

५१) आपला देश, आपले सरकार,
संविधानाने दिला अधिकार

५२) संविधान भारताचा आधार,
कुणी नसेल निराधार

५३) हक्क बजावू, कर्तव्य पाळू 
 प्राणपणाने संविधान सांभाळू

५४) संविधानाची हीच ग्वाही,
उच्च-नीच कोणी नाही
५५) नको राजेशाही, नको ठोकशाही,
संविधानाने दिली लोकशाही
५६) भारताचे एकच विधान,
संविधान ! संविधान !

   *जय भारतीय संविधान...जय हिंद🇮🇳जय भारत!🌷🙏🏻*

No comments:

Post a Comment

Featured Post

Independence Day Speech

Independence Day Speech          Good morning respected Principal, teachers, and my dear friends,      Today, we have gathered here to celeb...