Thursday, July 20, 2023

Let's Read English Activity

 

*Let's Read English Activity*

 *चला इंग्रजी वाचूया उपक्रम*

*विद्यार्थ्यांसाठी  उपक्रम*

🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

🟣 *Let's Read English*

🟢 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 1*

🟠 *For Remedial Teaching*

🔵 *a या स्वराचे विविध उच्चार होणारे शब्द*

https://youtu.be/B4HQFRgkT4w


  🎾🎾🎾🎾🎾                                  

🔵 *Let's Read English*

🟢 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 2*

🟠 *इंग्रजीतील 'e' या स्वराचे विविध उच्चार होणारे शब्द*

https://youtu.be/wDzvIUdE4lE


🟣🟣🟣🟣🟣🟣🟣

🟠 *Let's Read English*

🟢 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 3*

🔵 *इंग्रजीतील 'i' या स्वराचे विविध उच्चार होणारे शब्द*

https://youtu.be/lBXP4Do-fSA


🟢🟢🟢🟢🟢🟢

🟣 *Let's Read English*

🟠 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 4*

🔵 *इंग्रजीतील 'o' या स्वराचे विविध उच्चार होणारे शब्द*

https://youtu.be/bd1O_JXaqh4


🟠🟠🟠🟠🟠🟠🟠

🔵 *Let's Read English*

🟣 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 5*

🟢 *इंग्रजीतील 'u' या स्वराचे विविध उच्चार होणारे शब्द*

https://youtu.be/w4B84GSUwrM


🟢🟢🟢🟢🟢🟢

🟣 *Let's Read English*

🟠 *चला इंग्रजी वाचूया* *भाग 6*

🔵 *Silent Letters in English*

https://youtu.be/HSrwLizMcsQ


*For Remedial Teaching* 

*इंग्रजी प्रभावीपणे व confidently वाचण्यासाठी*

आपल्या विद्यार्थ्यांना नक्की share करा. 

*विद्यार्थ्यांसाठी उपक्रम*

         - *Sharad Pandhare*

📒📕📗📘📙📚📓🎤🎧

Saturday, July 8, 2023

गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यक्रमात सन्मान करतांना भाषण

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यक्रमात सन्मान करतांना भाषण 


व्यक्तीच्या व आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये समाज फार महत्वाची भूमिका पार पाडत असतो. चांगले आचार विचार आपण वास्तव्य करत असलेल्या समाजातून आपल्यामध्ये नकळत बिंबवले जात असतात. आपण शिक्षण घेत असलेल्या शाळा, महाविद्यालये यांच्या उभारणीत समाजाचा फार मोठा वाटा असतो. समजामुळेच आपली identity (ओळख) बनत असते. 

     त्यामुळेच आपण मिळवलेल्या यशाचा समाजाला सार्थ अभिमान वाटत आहे. यापुढील काळातही आपली प्रगतीची वाटचाल कायम राहावी व आपण आपल्या जीवनात अपेक्षित ध्येय प्राप्ती करावी. ज्ञानाची नवनवीन क्षितिजे पदाक्रांत करावीत. यासाठी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आपल्याला प्रेरणा द्यावी यासाठी आपला हा सन्मान खऱ्या अर्थाने आयोजित केलेला आहे.

    मित्रांनो आपण इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसर्स, नक्कीच बनाल. पण त्या अगोदर एक चांगला माणूस बनायला हवे.

*कविवर्य पाडगाकरांच्या शब्दात सांगायचे तर,*

"कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हा धर्म देवळे धूंडून सर्व आलो

भिंतिपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी "


असा माणूस म्हणून मित्रांनो आपण आपल्याला घडवायला लागेल. आजकाल नोकऱ्या नाहीत असे आपण म्हणत असतो. परंतु

माणुसकीचा परीसस्पर्श लाभलेले इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर, ऑफिसर्स, राजकारणी आजकाल दुर्मिळ झाले आहेत. तिथे फार मोठ्या प्रमाणात vacancy आहे. 


मित्रांनो या समाजाप्रती आपले प्रत्येकाचे देणं लागतं.


"देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे."


गुणी व गुणवान माणसे ही समाजाची संपत्ती आहेत. आपला गौरव करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

आपणांस आपल्या उज्वल भवितव्यासाठी व आपल्या आयुष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!


- शरद पांढरे 

Tuesday, February 28, 2023

English मराठी - कातकरी बोलीभाषा शब्दकोश

 Let's Learn the Premitive Tribe's Language through English

English मराठी - कातकरी बोलीभाषा शब्दकोश -  श्री शरद पांढरे 

What are you doing?  काय करस?


Boy, what are you doing?  ए सोहरा काय करस?


Hey girl, what are you doing?  ए सोहरे काय करस?


Where are you going? कट जास?


I am going to the jungle. मा रानात जातावं.


Why are you doing?  कासा करस?


What is your name?  नाव काय हा तुना ?


My name is Ramshya. माना नाव रामश्या हा.


What is your father’s name? तुने बासना नाव काय हा?


What is your mother’s name? तुने आसना नाव काय हा?


Whose son are you?  कोनाना सोहरा हास रं तू?


Whose daughter are you?  कोनानी सोहरी हास वं तू?


Where do you work?  तु कट काम करस?


  I work at the brickwork site. मां इटभटीवं काम करतावं.


How much wages do you get there? कती मंजुरी मिलं रं तट?


I get Rs.100 per day  wage.
 मला शंभर रुप्या मंजुरी मिलं दिसाची.
 

Featured Post

Teacher Meaning in English and Marathi

 * TEACHER*  Acrostic  📚📚✒️🌈 Meaning of the letter *T* https://youtu.be/ccdq-P_p81w?si=Tp5eypIBm5nrxMtb Meaning of the letter *E* https:/...