Saturday, July 8, 2023

गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यक्रमात सन्मान करतांना भाषण

 

गुणवंत विद्यार्थ्यांचा सामाजिक कार्यक्रमात सन्मान करतांना भाषण 


व्यक्तीच्या व आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये समाज फार महत्वाची भूमिका पार पाडत असतो. चांगले आचार विचार आपण वास्तव्य करत असलेल्या समाजातून आपल्यामध्ये नकळत बिंबवले जात असतात. आपण शिक्षण घेत असलेल्या शाळा, महाविद्यालये यांच्या उभारणीत समाजाचा फार मोठा वाटा असतो. समजामुळेच आपली identity (ओळख) बनत असते. 

     त्यामुळेच आपण मिळवलेल्या यशाचा समाजाला सार्थ अभिमान वाटत आहे. यापुढील काळातही आपली प्रगतीची वाटचाल कायम राहावी व आपण आपल्या जीवनात अपेक्षित ध्येय प्राप्ती करावी. ज्ञानाची नवनवीन क्षितिजे पदाक्रांत करावीत. यासाठी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप मारून आपल्याला प्रेरणा द्यावी यासाठी आपला हा सन्मान खऱ्या अर्थाने आयोजित केलेला आहे.

    मित्रांनो आपण इंजिनियर, डॉक्टर, ऑफिसर्स, नक्कीच बनाल. पण त्या अगोदर एक चांगला माणूस बनायला हवे.

*कविवर्य पाडगाकरांच्या शब्दात सांगायचे तर,*

"कोलाहलात साऱ्या माणूस शोधतो मी

गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी

हा धर्म देवळे धूंडून सर्व आलो

भिंतिपल्याड त्यांच्या माणूस शोधतो मी "


असा माणूस म्हणून मित्रांनो आपण आपल्याला घडवायला लागेल. आजकाल नोकऱ्या नाहीत असे आपण म्हणत असतो. परंतु

माणुसकीचा परीसस्पर्श लाभलेले इंजिनिअर, कॉन्ट्रॅक्टर, डॉक्टर, ऑफिसर्स, राजकारणी आजकाल दुर्मिळ झाले आहेत. तिथे फार मोठ्या प्रमाणात vacancy आहे. 


मित्रांनो या समाजाप्रती आपले प्रत्येकाचे देणं लागतं.


"देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे

घेता घेता एक दिवस

देणाऱ्याचे हात घ्यावे."


गुणी व गुणवान माणसे ही समाजाची संपत्ती आहेत. आपला गौरव करतांना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.

आपणांस आपल्या उज्वल भवितव्यासाठी व आपल्या आयुष्यात उत्तुंग भरारी घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा!


- शरद पांढरे 

No comments:

Post a Comment

Featured Post

Independence Day Speech

Independence Day Speech          Good morning respected Principal, teachers, and my dear friends,      Today, we have gathered here to celeb...